महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

जैव खत

जैव खत

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (बायो फर्टिलायझर.)

१. जैविक खते म्हणजे काय ?

उ.: जैविक खतांमध्ये  सूक्ष्मजीव  उपलब्ध असतात, जे की बियांना, मुळांना किंवा मातीसाठी वापरण्यात येतात. त्यांच्या जैविक कार्याद्वारे पोषक तत्वाची उपलब्धता एकत्रित उपलब्धता करून  सूक्ष्म वनस्पती  तयार होण्यास मदत  होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

२. आपण जैविक खते का वापरावे?

उ: हरित क्रांती तंत्रज्ञानाची ओळख करुन आधुनिक शेती अधिकाधिक कृत्रिम निविष्ठांच्या (मुख्यत: खते) पुरवठ्यावर अवलंबून आहे, जी जीवाश्म इंधनाची (कोळसा + पेट्रोलियम) उत्पादने आहेत. या कृत्रिम निविष्ठांच्या अत्यधिक आणि असंतुलित वापरामुळे जमिनीवर तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत. या परिस्थितीमध्ये जैविक खते यासारख्या नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्यास मातीचे आरोग्य आणि पिकाच्या उत्पादनांचा दर्जा राखण्यास मदत होईल.

३. कोणत्या प्रकारचे जैविक खते उपलब्ध आहेत?

उ.:

नत्रासाठी

  • शेंगावर्गीय पिकांसाठी  रायझोबियम.
  • शेंगा नसलेल्या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर/ॲझोस्पिरिलम.
  • फक्त ऊसासाठी अ‍ॅसिटोबॅक्टर.
  • भात पिकासाठी निळा-हिरवा शैवाल (बीजीए) आणि अझोला.

स्फुरदसाठी

  • स्फुरद विरघळविणारे जीवाणू (सर्व पिकांसाठी)

पालाशसाठी

  • पालाश उपलब्ध करणारे जीवाणू (सर्व पिकांसाठी)

४. जैविक खते वापरताना कोणती खबरदारी घ्यावी?

उ:

  • जैविक खते थेट सूर्यप्रकाशत आणि उष्णतेपासून दूर थंड आणि कोरड्या जागी ठेवणे आवश्यक आहे.
  • तर रसायने जसे की, किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व रासायनिक खते ही जैविक खतांमध्ये मिसळू नयेत.
  • जैविक खते मुदतबाह्य होण्यापूर्वीच वापरावे.
  • जीवाणू खते जीवंत राहण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
  • बुरशीनाशके व कीटकनाशके यांची बीजप्रक्रिया करावयाची असल्यास त्यानंतरच जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.

५. जैविक खते कोण वापरू शकेल ?

उ: शेंगवर्गीय, नगदी पिके, धान्य पिके, चारा पिके, तेलबिया पिके, बागायती पिके, भाज्या, फळझाडे या पिकांमध्ये जैविक खते वापरता येतात.

६. आपण रासायनिक खतांसह जैविक खते वापरू शकतो का?

उ: आपण देत असलेल्या रासायनिक खताची मात्रा व त्यामधून वनस्पतीला उपलब्ध होणाऱ्या पोषक द्रव्यांची मात्रा यामध्ये भरपूर प्रमाणात तफावत असते. जैविक खते वनस्पतींमध्ये अजैविक घटकांची उपलब्धता वाढवते. रासायनिक खतांसह जैविक खतांचा वापर केला जाऊ शकतो. परंतु जैविक खतांसह रासायनिक खताचा थेट संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यामुळे जैविक खतातील जिवाणूंची संख्या कमी होणार नाही.

७. जैविक खतांचे कोणते फायदे आहेत?

उ:

  • जमिनीची उत्पादकता वाढविण्यास मदत.
  • किफायतशीर खर्च.
  • रासयानिक खतांना पूरक.
  • पर्यावरणास अनुकूल (निसर्गाशी अनुकूल)
  • नत्र, स्फुरद, पालाश यासारख्या रासायनिक खतांची मात्रा कमी करून खर्चामध्ये बचत होते.

८. रासायनिक खते ही जैविक खतांपेक्षा वेगळी कशी आहेत?

उ: रासायनिक खतांचे उत्पादन कृत्रिमरित्या केले जाते. मुख्यत: नत्र, स्फुरद आणि पालाश असणारी रसायने मुख्यत: मातीची पोषकद्रव्ये आहेत.जैविक खते ही जीवाणू (ॲझोटोबॅक्टर, राइझोबियम इ.), बुरशी इ. सारख्या वनस्पती आहेत, जे वातावरणातून मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात, ज्याचा वापर पिकवाढीकरीता होतो.