महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

हरभरा

हरभरा

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
विजय म. फु. कृ. वि., राहुरी 1993 60 १०५ ते ११० लवकर येणारे वाण, कोरडवाहु तसेच वेळेवर उशिरा बागायती लागवडीकरीता योग्य, मर रोगास प्रतिबंधक, फिक्कट करडया रंगाचे दाणे. १४ ते १५
विशाल म. फु. कृ. वि., राहुरी 1995 60 १०५ ते ११० मर रोगास प्रतिकारक्षम, आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, दाण्याचा रंग लाल. १४ ते १५
विराट म. फु.‍ कृ. वि., राहुरी 2001 60 १०८ ते ११८ पसरट फिक्कट पिवळी पाने, निमपसरी वाढ, पांढरी फुले, काबुली वाण, , मर रोग प्रतिकारक. १६ ते २०
पिडीकेव्ही कांचन (एकेजी-1109) डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला 2018 60 १०० ते ११० अधिक उत्पादन देणारा व लवकर परिपक्व होणारा वाण, मध्यम जाड दाणे. २० ते २५
फुले विक्रांत म. फु.‍ कृ. वि. राहुरी 2017 60 १०० ते ११० मर रोगास प्रतिकारक्षम वाण. २० ते २२
फुले विक्रम म. फु.‍ कृ. वि. राहुरी 2016 60 ९६ ते ११२ मध्यम आकाराची पाने, मध्यम उंच वाढ, मध्यम आकाराची घाटे व तपकिरी दाणे, २ दाणे प्रति घाटा, यांत्रिक पध्दतीने काढणे सोइस्कर, मर रोग प्रतिकारक. १६ ते २२
बीडीएनजीके -७९८ व. ना. म. कृ. वि., परभणी 2013 75 ११० ते ११५ कोरडवाहु व बागायती लागवडीस योग्य, मर रोगास प्रतिकारक, टपोरे दाणे, दाण्यांचा रंग पांढरा. १६ ते १८
कृपा (बोल्ड) म. फु.‍ कृ. वि. राहुरी 2009 75 १०५ ते ११० जास्त टपोरे घाटे असणारा काबुली वाण,  पांढ-या रंगाचे दाणे . १८ ते २०
दिग्वीजय म. फु. कृ. वि., राहुरी 2006 60 १०५ ते ११० गर्द हिरवी पाने, निमपसरी वाढ, गुलाबी फुले, मध्यम टपोरा पिवळसर तांबुस दाणा,  अधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक. १४ ते १५
जॅकी-९२१८ डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला 2005 75 १०५ ते ११० जांभळट खोड, मोठी फिक्कट हिरवी पाने,‍ निमपसरी वाढ, गडद गुलाबी रंगाची फुले, सरासरी १ ते २ दाणे प्रति घाटा, मर रोगास प्रतिकारक वाण. १८ ते २०
पिडीकेव्ही कनक (एकेजी-1303) डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला 2020 60 १०० ते ११० मध्यम टपोरा दाण्याचा वाण, लवकर व एकाच वेळी परिपक्व होणारा वाण, मर रोगास सहनशील,‍ संरक्षीत ओलिताखाली लागवडीसाठी शिफारस. २२ ते २५
फुले विश्वराज (फुले जी-15109) म. फु. कृ. वि., राहुरी 2021 60 95 ते 105 पिवळसर तांबुस मध्यम आकाराचे दाणे, मर रोगास प्रतिकार 28 ते 29
पुसा मानव (बीजी-20211) आय ए आर आय, दिल्ली 2021 60 108 मध्यम उंच वाढ, फुलांचा रंग जांभळा, लवकर परिपक्व होणारे वाण, घाटे अळी रोगास प्रतिकारक्षम. 20