महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

आम्हाला ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

तूर

तूर

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
एमपीव्ही-१०६ महाबीज, अकोला 2020 12 १६५ ते १७४ झाडाची उंची १३५ ते १५० सें. मी., मध्यम वाढणारे वाण, हिरव्या शेंगावरती तपकीरी रंगाचे पट्टे, ३ ते ४ दाणे प्रती शेंग, मर रोगास मध्यम प्रतिकारक तसेच शेंगा पोखरणा-या अळीस प्रतिकारक. १४ ते १५
बीडीएन-७१६ व. ना. म. कृ. वि., परभणी 2018 12 १६० ते १६५ अनिश्चित वाढ, फुलाचा रंग पिवळा, पोपटी रंगाच्या शेंगा, ३ ते ४ दाणे प्रती शेंग, मोठा टपोरा दाणा. १८ ते २०
पिकेव्ही-तारा डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला 2013 12 १७० ते १७५ हिरव्या खोडावर जांभळट रंग, लॅन्सीओलॅटर प्रकारचे हिरवे पान, निम पसरट वाढ, पिवळया फुलावर फिक्कट लाल पट्टे, मर व वांझ रोगास प्रतिकारक. १९ ते २२
राजेश्वरी (फुले-१२) म. फु. कृ. वि., राहुरी 2013 12 १४५ ते १५० जांभळट हिरवे खोड, निमपसरी वाढ, ४ दाणे प्रती शेंग हिरव्या शेंगावर जांभळट पटटा, मर व वांझ रोगास सहनशील. २० ते २२
बीडीएन-७११ व. ना. म. कृ. वि., परभणी 2012 12 १५० ते १५५ सुर्यमुखी लाल रंगाचे खोड, शेंगाचा रंग पोपटी, दाण्याचा रंग पांढरा, मर व वांझ रोगास प्रतिकारक. १५ ते २३
बीएसएमआर-७३६ व. ना. म. कृ. वि., परभणी 1994 12 १८० ते १८५ हिरवट रंगाची खोड, पिवळी फुले, हिरव्या रंगाचे शेंगा, ३ ते ४ प्रती शेंग, लाल रंगाचे दाणे, मर व वाण रोगास प्रतिकारक. १२ ते १४
आयसीपीएल-८७११९ (आशा) ए.आय.सी.पी आय.पी., कानपूर 1993 12 १८० ते २०० भारी जमिनीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक, टपोरे लाल दाणे. १८ ते २५
आयसीपी-८८६३ (मारोती) इक्रीसॅट, हैद्राबाद 1986 12 १५० ते १६० हिरवे खोड, निमपसरी निश्चित वाढ, पिवळया फुलावर लालसर छटा व हिरव्या शेंगावर जांभळट छटा मर रोगास प्रतिकारक. १८ ते २०