महाबीजमध्ये आपले स्वागत
महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादितगत
स्थाने

"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"

ईमेल करा

hoadmin@mahabeej.com

संकरित ज्वारी

संकरित ज्वारी

पिकाचे /वाणाचे नाव अधिसुचित संस्था प्रसारित वर्ष  बियाणे मात्रा (किलो/ हेक्टर) कालावधी (दिवस) वाणांचे गुणधर्म  उत्पादन (क्विंटल/ हेक्टर)
सीएसएच-१४ (एसपीएच-४६८) डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला 1990 10 १०३ ते १०५ कणीस वरच्या टोकाला लांब दंडगोलाकार, दाण्यांचा आकार गोलाकार, बियांचा आकार मध्यम, न लोळणारा वाण. ४५ ते ४८
सीएसएच-९ आय.आय.एम. आर., हैद्राबाद 1981 10 ११० ते १२० कणीसाचा आकार लंबवर्तुळाकार, लांबीला मध्यम, रसाळ आणि पानांचे आवरण पूर्णपणे बंद. न लोळणारा वाण. ४० ते ४२
एसपीएच-१६३५ डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 2015 10 ११० ते ११५ झाडाची उंची सरासरी २१० ते २१५ सें.मी., दाण्याचा रंग मोत्यासारखा (पांढरा). ४५ ते ५०
सीएसएच-३० (एसपीएच-१६५५) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 2013 10 १०० ते १०५ धान्य व चारा दोन्ही करीता योग्य, भरघोस उत्पादन, बहुरोग प्रतिकारक्षम. 43
महाबीज-७ महाबीज, अकोला 2000 10 १०० ते ११० सरळ उभी वाढ, पानांचा रंग हिरवट, गोलाकार मोत्यासारखा पांढरा चमकदार दाणा, लवकर पेरणीस उपयुक्त. ४७ ते ५२
सीएसएच-३५ (एसपीएच-१७०५) डॉ. पं. दे. कृ. ‍वि., अकोला 2016 10 १०० ते ११० अधिक उत्पादन देणारे वाण, भाकरीची प्रत उत्तम. ४२ ते ४५
भाग्यलक्ष्मी-२९६ इक्रीसॅट, हैद्राबाद -- 10 १०५ ते ११० पांढरे टपोरे मोठे दाणे, सरळ उभी वाढ. ४८ ते ५०