"महाबीज भवन", कृषी नगर, अकोला. पिन ४४४१०४, महाराष्ट्र, भारत"
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने सन १९९३ पासुन ऊती संवर्धीत केळी रोपांच्या उत्पादनास सुरवात केलेली आहे. सन २००२ मध्ये व्यावसायिक दृष्टया मोठ्या प्रमाणावर ऊती संवर्धीत केळी रोपांची उपलब्धता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावी या उद्देशाने महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र, नागपूर येथे अत्याधुनिक ऊती संवर्धन प्रयोगाशाळेची स्थापना करण्यात आली. केळी हे एक उष्णकटीबंधीय फळ पिक असुन मुख्यत्वे कंदाव्दारे त्याची लागवड केल्यास, बंची टॉप सारख्या विषाणुजन्य रोगास हे पिक बळी पडते आणि त्याची परिणीती म्हणजे उत्पादनात मोठया प्रमाणावर घट होते. ऊती संवर्धीत तंत्रज्ञानाचा वापर करून कंदाच्या आत वाढणाऱ्या एका अंकुरापासून अनेक एकसारख्या विषाणुमूक्त रोपांची निर्मिती करता येते. हे तंत्रज्ञान वापरून मोठया प्रमाणावर रोगमुक्त केळीची रोपे तयार केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीस मदत होते.
ग्रोथ रूम
बनाना रूट
उती संवर्धित स्ट्रोबेरी
उती संवर्धित पपई
उती संवर्धित रसेल लुपिन
उती संवर्धित केळी रोपे
विक्रीस उपलब्ध उती संवर्धित केळी रोप
जी-९ टिश्यू कल्चर केळीची वनस्पती
ग्रेडनैन ही जगात सर्वात जास्त लागवड केल्या जाणारी मुसा अॅक्युमीनेट परिवारातील कॅव्हेंडिश केळी आहे. ईस्राइल मधुन भारतात आलेल्या सर्व केळी वाणांमध्ये जी-९ हे वाण सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण आहे. या वाणामध्ये वाऱ्याला प्रतिकार करण्याची व उत्कृष्ट लॅडस्केपींग क्षमता आहे. परिपुर्ण वाढ झालेल्या ग्रेडनैन केळी झाडांची उंची ६ ते ८ फुट असुन ग्रेडनैन ची फळे खाण्यास चवदार व इतर प्रचलित वाणाच्या तुलनेत दिर्घकाळ टिकणारी असतात. या वाणाची लागवड करतांना ६x६ फुट अंतरावर जवळपास १२०० झाडांची प्रति एकर लागवडीची शिफारस केली जाते.
तद्वतच सन २०१७ मध्ये महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र, नागपूर यांना भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभाग, नवी दिल्ली यांची मान्यता मिळालेली आहे.
यानंतर सन २०२० मध्ये नॅशनल सर्टिफिकेशन सिस्टम फॉर टिश्यू कल्चर रेज्ड प्लॅंटस् (एनसीएस-टीसीपी) नवी दिल्ली यांनी सुध्दा मान्यता दिलेली आहे. आम्हाला हे सांगण्यास अभिमान वाटतो कि, महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र, नागपूर ही प्रतिष्ठीत मान्यता मिळवणारे सपूर्ण भारतातील एकमेव निमशासकिय संस्था आहे
ऊती संवर्धन तंत्रज्ञानामध्ये प्रयोगशाळेत झाडांच्या अवयवांपासुन रोपांची निर्मिती केल्या जाते. ऊती संवर्धन तंत्रज्ञान हे असे आदर्श तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये वनस्पतीशी संबंधीत शारीरिक, जैव रसायन, आनुवांशिक आणि संरचनात्मक समस्यांची तपासणी करता येते
केळी व्यतिरीक्त आमचे पपई व बांबु हे येऊ घातलेले प्रकल्प आहेत. बांबु हे बारमाही, लाकुड या सज्ञेत न मोडणारे दैनंदिन जिवनातील बहुपयोगी, आयुर्वेदिक औषधी, गवत वर्गीय वनस्पती आहे. ज्याला प्रचंड पर्यावरणीय सामाजीक आणि व्यावसायीक महत्व आहे. बांबुची अभिवृध्दी ही मुख्यत्वे: त्याच्या बियांपासुन किंवा त्याच्या कंदाव्दारे केली जाते. परंतु या दोन्ही पारंपारिक तंत्राव्दारे मोठया प्रमाणावर लागवड करण्यासाठी लागणाऱ्या रोपांच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होत आहे. मोठया प्रमाणावर बांबुची लागवड करण्याकरिता ऊती संवर्धीत जैव तंत्रज्ञानाचा वापर करून रोपे तयार करणे ही आता काळाची गरज झालेली आहे.
पपई हे पारंपारीकपणे मुख्य्त्वे: बियांपासुन अभिवृध्दी होणारे पीक आहे व बियांपासुन पीक घेत असल्यामुळे मोठया प्रमाणावर पुढील पिढयांमध्ये बदल होत आहेत.
ऊती संवर्धीत तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळात चांगल्या वाणाच्या आनुवांशिक शुध्दतेची रोपे तयार करणे शक्य होणार आहे. व हा पपई पीक वाढीसाठी मौल्यवान पर्याय आहे.या व्यतिरिक्त, महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र, नागपूर येथे पपई तायवान -७८६ हया वाणाची मोठया प्रमाणवर रोपांची निर्मिती करून विक्री करण्यात येते.
या सोबतच फळ पिकांच्या रोपांची उदा. आंबा, लिंबू, चिकू, आवळा, फणस, सिताफळ, जांभुळ, पेरू, नारळ इत्यादी रोपांची विक्री सुध्दा नर्सरी मधुन केल्या जात.
.